HTML/JavaScript

Sorry, your browser does not support canvas.

Tuesday, 26 April 2022

प्रगती पत्रक नोंदी यादी 📕📕विशेष प्रगती 📕📕➡ 1 शालेय शिस्त आत्मसात करतो 2 दररोज शाळेत उपस्थित राहतो 3 वेळेवर अभ्यास पूर्ण करतो 4 गृहपाठ वेळेत पूर्ण करतो 5 स्वाध्यायपुस्तिका स्वत: पूर्ण करतो 6 वाचन स्पष्ट व शुद्ध करतो 7 कविता पाठांतर करतो, सुरात गातो 8 इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो 9 ऐतिहासिक माहिती मिळवतो 10 चित्रकलेत विशेष प्रगती 11 दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो 12 गणितातील क्रिया अचूक करतो 13 शिक्षकाविषयी आदर बाळगतो 14 शालेय उपक्रमात सहभाग घेतो 15 सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो 16 प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करते 17 खेळ उत्तम प्रकारे खेळते 18 विविध खेळ प्रकारात भाग घेतो 19 समानार्थी शब्दांचा संग्रह करतो 20 दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो 21 प्रयोगाची मांडणी अचूक करतो 22 चित्रे छान काढतो व रंगवतो 23 उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेते 24 प्रयोगवहीत आकृत्या छान काढते 25 दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करते 26 स्वाध्याय स्वत: समजून सोडवितो 27 शाळेत नियमित उपस्थित राहतो  28 वाचन स्पष्ट उच्चारात करतो 29 शब्दांचे वाचन स्पष्ट करतो 30 संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो 31  कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो 32 वाचन स्पष्ट व अचूक करतो 33 चित्राचे निरीक्षण करतो व वर्णन सांगतो 34 नियमित शुद्धलेखन करते 35 शालेय उपक्रमात सहभाग घेते 36 स्वाध्याय वेळेवर पूर्ण करते 37 कार्यानुभवातील वस्तू बनवितो 38 तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगते 39 गणितातील उदाहरणे अचूक सोडविते 40 प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो 41 सुविचार व बोधकथा संग्रह करतो 42 हिंदीतून पत्र लिहितो 43 परिपाठात सहभाग घेते 44 इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करते 45 क्रीडा स्पर्धेत सहभाग घेते 46 मुहावर्‍याचा वाक्यात उपयोग करते 47 प्रयोगाची कृती अचूक करते 48 आकृत्या सुबक काढते 49 वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो 50 वर्तमान पत्राची कात्रणे संग्रहीत करते 51 शाळा बाह्य परीक्षेत सहभाग 52 सांस्कृतिक कार्यात सहभागी होते 53 व्यवहार ज्ञान चांगले आहे 54 अभ्यासात सातत्य आहे 55 वर्गात क्रियाशील असते 56 अभ्यासात नियमितता आहे 57 वर्गात लक्ष देवून ऐकतो 58  प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक  देतो 59 गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो 60 अभ्यासात सातत्य आहे 61 अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो 62 उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो 63 वर्गात नियमित हजर असतो  64 स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो 65 खेळण्यात विशेष प्रगती 66 Activity मध्ये सहभाग घेतो 67 सर्व विषयाचा अभ्यास उत्तम 68 विविध प्रकारची चित्रे काढते 69  इंग्रजी हिंदी वाचन सराव करावा संकलन सौ. एस .व्ही.लोहेकर आवड /छंद➡ 1 चित्रे काढतो 2 गोष्ट सांगतो 3 गाणी -कविता म्हणतो 4 नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो 5 खेळात सहभागी होतो 6 अवांतर वाचन करणे 7 गणिती आकडेमोड करतो 8 कार्यानुभवातील वस्तु बनवितो 9 स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो 10 कथा,कविता,संवाद लेखन करतो 11 वाचन करणे 12 लेखन करणे 13 खेळणे 14 पोहणे 15 सायकल खेळणे 16 चित्रे काढणे 17 गीत गायन 18 संग्रह करणे 19 उपक्रम तयार करणे 20 प्रतिकृती बनवणे 21 प्रयोग करणे 22 कार्यानुभवातील वस्तू तयार करणे 23 खो खो खेळणे 24 क्रिकेट खेळणे 25  संगणक हाताळणे 26 गोष्टी ऐकणे 27 गोष्टी वाचणे 28 वाचन करणे 29 रांगोळीकाढणे 30 प्रवास करणे 31 नक्षिकाम 32 व्यायाम करणे 33 संगणक 34 नृत्य 35  संगीत ऐकणे 🍀🍀सुधारणा आवश्यक ➡ 1 वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे 2 अभ्यासात सातत्य असावे 3 अवांतर वाचन करावे 4 शब्दांचे पाठांतर करावे 5 शब्दसंग्रह करावा 6 बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे 7 नियमित शुद्धलेखन लिहावे 8 गुणाकारात मांडणी योग्य करावी 9 खेळात सहभागी व्हावे 10 संवाद कौशल्य वाढवावे 11 परिपाठात सहभाग घ्यावा 12 विज्ञानाचे प्रयोग करून पहावे 13 हिंदी भाषेचा उपयोग करावे 14 शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा 15 गटचर्चेत सहभाग घ्यावा 16 चित्रकलेचा छंद जोपासावा 17 वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे 18 संगणकाचा वापर करावा 19 प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा 20 गणित विषयाकडे लक्ष द्यावे 21 गटकार्यात सहभाग वाढवावे 22 गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे 23 हस्ताक्षरात सुधारणा करावी 24 विज्ञान प्रयोगात सहभाग असावा 25 इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे 26 इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे 27 इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे 28 इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा 29 शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा 30 शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे 31 शालेय परिपाठात सहभाग असावा 32 उपक्रमामध्ये  सहभाग असावा 33 लेखनातील चुका टाळाव्या 34 नकाशा वाचनाचा सराव करावा 35  उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा 36 नियमित अभ्यासाची सवय लावावी 37 नियमित उपस्थित राहावे 38 जोडाक्षर वाचनाचा सराव करावा 39 वाचन व लेखनात सुधारणा करावी 40 अवांतर पुस्तकाचे वाचन करावे 41 प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे 42 अक्षर सुधारणे आवश्यक 43 भाषा विषयात प्रगती करावी 44 अक्षर वळणदार काढावे 45 गणित सूत्राचे पाठांतर करावे 46 स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे 47 दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे 48 गणिती क्रियाचा सराव करा 49 संवाद कौशल्य आत्मसात करावे 50 गणितातील मांडणी योग्य करावे 51शुध्दलेखनाकडे लक्ष द्यावे . 52 इंग्रजी शब्दसंग्रह वाढवावा वरील नोंदी महत्वपुर्ण आहेत संग्रहीत ठेवाव्यात

Tuesday, 12 April 2022

स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री ,भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्याय शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ ,भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती 14 एप्रिल 1891 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. प्रचंड बुद्धीमत्ता ,समाजासाठी असीम त्याग, करणारे दलित समाजाला हक्क मिळवून देणारे ,महाडचा सत्याग्रह, मनुस्मृति दहन, मंदिर सत्याग्रह, शेतकऱ्यांचा कैवारी, गोलमेज परिषद पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्ष, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना, दलित शिक्षण संस्थेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, महिलांसाठी हिंदू कोड बिल पास न झाल्यामुळे कायदे मंत्री मंत्रिपदाचा त्याग, स्वातंत्र्यलढ्यात सहभाग अशा कितीतरी गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात केल्या. समाजासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले समाजातील तळागाळातील व्यक्तींचा विचार केला .समाजाच्या कल्याणासाठी व शिक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष केला शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र दिला. अशा या महामानवाचा आज 131 वी जयंती निमित्ताने त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी प्रश्नमंजुषा🏵️🏵️🏵️🏵️🏵️ https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfh2q0jcIwr5NWrZUtQx0Xa75xX4-DopuSP_B7bIlu65-EzbA/viewform दिलेल्या लिंक ला क्लिक करून ऑनलाइन प्रश्नमंजुषा सोडवा व डिजिटल आकर्षक प्रमाणपत्र मिळवा प्रथम लिंक क्लिक करून तुमचा ईमेल आयडी, पूर्ण नाव व शाळेचे नाव लिहा नंतर Next या बटनावर क्लिक करून प्रश्नपत्रिका सोडवून submit करा view score क्लिक करून तुमचे मार्क्स बघा. व प्रमाणपत्र डाऊनलोड करा

Friday, 1 April 2022

1 एप्रिल रिझर्व बँक स्थापना दिन******************************** *@ १ एप्रिल @* *रिजर्व बँक स्थापना दिन* ******************************** स्थापना - १ एप्रिल १९३५ आज आपण रिझर्व बँकेची कल्पना करतो. देश स्वतंत्र झाला नव्हता तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शोधनिबंधात भारतात रिझर्व बँकेची कल्पना केली होती. आज आपण संघीय क्षेत्राबद्दल बोलतो, वित्त आयोग, राज्यांची मागणी असते, इतके पैसे कोण देईल, कोणते राज्य कोणत्या क्रमाने चालेल. देश स्वतंत्र होण्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी हे विचार मांडले होते. वित्त आयोगाचा, संपत्तीची वाटणी केंद्र आणि राज्यांमध्ये कशी असावी याचे सखोलपणे त्यांनी विचार मांडले होते आणि त्याच विचारांच्या प्रकाशात आज हा वित्त आयोग, मग ती आरबीाआय असो, अशा अनेक संस्था आहेत. रिजर्व बँक हि एक केंद्रीय बँकिंग संस्था आहे जी भारतीय चलन विषयक नियमावली आणि आर्थिकनीती वर नियंत्रण ठेवते तसेच भारत सरकारच्या उन्नती आणि विकास कामाच्या योजना ठरवते. भारतीय वित्त व्यवस्थेवर नियंत्रण तसेच महत्वाचे निर्णय घेते. रिजर्व बँक १ एप्रिल १९३५ साली ब्रिटीश राजवटीत स्थापन झाली. १९३५ साली स्थापन झालेल्या रिजर्व बँक ऑफ इंडिया च्या संकल्पनेत बाबासाहेबांच्या पुस्तकावर आधारित असलेल्या हिल्टन कमिशनच्या रिपोर्ट चा आधार घेण्यात आला. रिजर्व बँक ऑफ इंडिया हि संपूर्णपणे डॉ. बाबासाहेबांच्या विचारावर, आणि त्यांनी आखून दिलेल्या रूपरेषा आणि संकल्पनेवर सुरळीतपणे अव्याहत सुरु आहे. बाबासाहेबांनी 'प्रॉब्लेम ऑफ रुपी' मध्ये केलेलं विवेचन इतकं जबरदस्त होतं की, ब्रिटीश सरकारने वसाहतवादाच्या नावाखाली भारतातील परंपरागत व्यवसायांचं चालवलेलं शोषण जगासमोर उघडं पाडलं. तत्कालीन काँग्रेसने आंबेडकरांच्या या मांडणीला उचलून धरत ब्रिटीशांना ताणून धरलं. त्याचीच परिणीती लंडनहून एकुण प्रकरण तपासण्यासाठी रॉयल कमिशनच्या स्थापनेत झाली. १९३५ साली पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटीश राजवटीतील भारतीय अर्थ व्यवस्था सुरळीत राहावी म्हणून रिजर्व बँक ऑफ इंडिया स्थापन करण्याचे ठरले, जी भारतातील इतर वित्तीय संस्था आणी बँकांवर अंकुश ठेवून कारभार सुरळीत चालू राहील. रिजर्व बँक १९२५ साली भारतात नेमलेल्या रॉयल कमिशन म्हणजेच हिल्टन कमिशन च्या रिपोर्ट आणि तपशिला वरून बनवण्यात आली. बाबासाहेबांनी लिहिलेल्या तीनही आर्थिक ग्रंथांचा उपयोग करून तसेच त्यांच्या संकल्पना आणि कामकाजाची पद्धत रिजर्व बँकेच्या स्थापनेचा पाया ठरला. १९४९ साली रिजर्व बँक हि अधिकृत आणि संपूर्णपणे भारत सरकारच्या अंमलाखाली आहे. १९३५ मध्ये जेव्हा रिजर्व बँकेची स्थापना झाली तेव्हा बाबासाहेब सक्रिय राजकारणात सहभागी होते, मोर्चे-आंदोलने पक्ष बांधणी अशी धावपळ सुरु होती. याच वर्षी बाबासाहेब विधी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून नियुक्त झाले. याच वर्षी रमाई बाबासाहेबांना सोडून गेली. याच वर्षी बाबासाहेबांनी येवला नाशिक इथे मोठी सभा घेतली आणि "मी हिंदू म्हणून मरणार नाही!" अशी प्रतिज्ञा घेतली आणि याच वर्षी बाबासाहेबांचा दस्तावेज-ग्रंथ मात्र रिजर्व बँकेचा पाया रचण्यासाठी वापरले जात होते. इतर देशात अर्थ व्यवस्था ढासळत असताना सुद्धा बाबासाहेबांनी सुचवलेले मार्गदर्शक तत्वे आणि कार्यप्रणाली वर आज सुद्धा भारतीय रिजर्व बँक आणि भारतीय अर्थव्यवस्था डौलाने उभी आहे. **************************************************

https://wordwall.net/resource/104359008